संसदेचं आर्थिक वर्ष २०२३-२४ चं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून होणार सुरु
नवी दिल्ली, दि. १३: संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ते येत्या ६ एप्रिलपर्यंत चालेल. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ट्विटरवर ही माहिती प्रसिद्ध केली. ६६ दिवस चालणाऱ्या अधिवेशनात एकूण २७ बैठका होणार आहेत. देशाच्या अमृतकाळात अधिवेशनादरम्यान अर्थसंकल्प, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरचा आभार प्रस्ताव इत्यादींवर विधायक चर्चा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Source – AIR