राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. ही नवनिर्वाचित आमदारांना धमकी तर नाही ना? : संजय राऊत
मुंबई: शिवसेना आणि भाजप मधला सत्तासंघर्ष सध्या टिपेला पोहोचल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने सामानाचे कार्यकारी संपादक आणि नेते संजय राऊत आणि भाजपच्या बाजूने सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि स्वतः मुख्यमंत्री एकमेकांना बेटकुळ्या दाखवत आहेत. काल सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकार स्थापनस विलंब केल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे म्हटले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत की जर राज्यातील सरकार स्थापन करण्यास उशीर झाला तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. ही नवनिर्वाचित आमदारांना धमकी तर नाही ना?”
आता यावर भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.
