संजय मल्होत्रा होणार भारतीय रिझर्व बँकेचे २६ वे नवे गव्हर्नर
मुंबई, दि. ०९: भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकान्त दास यांचा कार्यकाळ उद्या दि. ०९/१२/२०२४ रोजी संपणार आहे. त्या जागी केंद्राने आता संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव राहिलेले संजय मल्होत्रा हे ११ डिसेंबर रोजी आरबीआय गव्हर्नर म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. १९९० च्या राजस्थान बॅच चे आयएएस अधिकारी असलेले मल्होत्रा हे भारतीय रिझर्व बँकेचे २६वे गव्हर्नर असतील. या आधी २०२२ साली त्यांची आरबीआय च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
