संजय दत्त लवकरच लोकसभा निवडणूक लढवणार?
लखनौ: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. संजय दत्त उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
वडील सुनील दत्त, बहिण प्रिया दत्त यांच्यापाठोपाठ आता अभिनेता संजय दत्तदेखील लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे.
२००९ साली जेव्हा संजय दत्तने राजकारणात प्रवेश केला, खासदार अमर सिंह यांच्या शब्दाला मन देत त्याने ‘सपा’मध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी संजय दत्तने लखनौ येथून निवडणूक लढविण्याची घोषणा देखील केली होती. परंतु काही कारणास्तव तो निवडणूक लढवू शकला नाही. नंतर अमरसिंह यांनी समाजवादी पक्षाला रामराम केल्यानंतर संजय दत्तनेही पक्षाशी फारकत घेतली.
गाझियाबादमध्ये केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्यासाठी समाजवादी पक्षातून शत्रुघ्न सिन्हा आणि संजय दत्त यांची नावं चर्चेत आहेत.
