Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माझ्या पोराला निवडून द्या, पार्थला साथ द्या- अजित पवारांचे मावळच्या जनतेला भावनिक साद

माझ्या पोराला निवडून द्या, पार्थला साथ द्या- अजित पवारांचे मावळच्या जनतेला भावनिक साद

पुणे: मावळ येथे रविवारी लोकसभेच्या पहिल्या प्रचार सभेमध्ये बोलताना आज माझ्यावर पोराला निवडून द्या म्हणण्याची वेळ आलीय, त्यामुळे पार्थला साथ द्या असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले.

निवडणुकीदरम्यान कोणी मॅच फिक्सिंग केलेली चालणार नाही, रात्री एक आणि दिवसा एक असं केलं तर खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाव न घेता युतीवर टीका केली.

तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मतदान करण्याची मावळवासियांना विनंती केली. भाजपाची हुकूमशाही आता खपवून घ्यायची नाही, असा सल्लाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी यावेळी उपस्थितांना दिला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *