मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला प्रारंभ
मुंबई, दि. १९: मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या पर्यावरणपूरक ई-बग्गी सेवेला आज प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दूरस्थ पद्धतीने याचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे उद्यानात प्रदूषणमुक्त पर्यटनाचा आनंद मिळेल, आणि पर्यटनाला चालना मिळेल असं गोयल यावेळी म्हणाले. ही ई-बग्गी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशदारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत धावेल. त्यामुळे प्रवास जलद आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे. वनमंत्री गणेश नाईक, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी वनविभागातील अतिक्रमण निर्मूलन व वनसंरक्षणामध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम करणारे वनपाल, वनरक्षक यांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अश्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या मुलांना देखील सन्मानित करण्यात आले.
