अक्सा बीचवर फिट इंडिया मुव्हमेंटने खेळ आणि तंदुरुस्तीप्रति निर्माण केली आवड
मुंबई, दि. २४: भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) रविवारी, २३ मार्च २०२५ रोजी मुंबईतील अक्सा बीच येथे क्रीडा आणि तंदुरुस्तीचा भव्य उत्सव साजरा करण्यासाठी फिट इंडिया बीच गेम्स २०२५ चे आयोजन केले.फिट इंडिया मुव्हमेंटच्या अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात विविध श्रेणींमधील खेळाडू, फिटनेसउत्साही/फिटनेसप्रती जागरूक नागरिक आणि क्रीडा प्रेमींचा सक्रिय सहभाग दिसून आला.
फिट इंडिया बीच गेम्समध्ये अनेक श्रेणींमध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता, ज्यामध्ये विशेष दिव्यांग खेळाडूंनी १०० मीटर आणि ५० मीटर धावणे, पॉवरलिफ्टिंग, लांब उडी आणि गोळाफेक अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. याव्यतिरिक्त, बीच फुटबॉलसह मल्लखांब सारख्या पारंपारिक भारतीय खेळांनी,वंचित खेळाडूंना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
प्रमुख पाहुणे आणि भालाफेकपटू ऑलिंपियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ रौप्यपदक विजेते किशोर जेना यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सहभागींचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. देशभरात क्रीडा क्षेत्रातील प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि तंदुरुस्तपणाची संस्कृती वाढवण्यासाठी तळागाळातील क्रीडा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमात एरोबिक्स, स्व-संरक्षण सादरीकरणे आणि पारंपारिक गटका मार्शल आर्ट्स प्रदर्शनासह विविध समृद्ध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विशेष दिव्यांग खेळाडूंनी प्रेरणादायी कामगिरी सादर केली, तर मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनने भारताच्या समृद्ध मार्शल आर्ट्स वारशाचे आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन केले.
एसएआय मुंबईचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सर्व सहभागी, स्वयंसेवक, समर्थक आणि माध्यम प्रतिनिधींचे त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले.
मुख्य प्रशिक्षक कुस्ती, राजसिंह छिकारा, सहाय्यक संचालक, एसएआय, अजिंक्य कर्पे, आणि अपूर्व मंदा, सहाय्यक संचालक, SAI हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
फिटनेसला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळ/मुव्हमेंट सुरू केली. या चळवळीचे ध्येय वर्तणुकीत बदल घडवून आणणे आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीकडे वाटचाल करणे हे आहे.
