
सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं निधन
मुंबई, दि. १५: सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सहाराश्री सुब्रतो रॉय यांचं काल रात्री मुंबईत निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल रात्री उपचारादरम्यान हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं. रॉय यांचा पार्थिव देह आज उत्तरप्रदेशात लखनौजवळ सहारा शहरात आणला जाणार असून, तिथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
Source – AIR