Video: बाहुबली प्रभास च्या ‘साहो’ चा धमाकेदार टिझर एकदा पहाच
श्वास रोखून पहावा असा प्रभास व श्रद्धा कपूर च्या ‘साहो’ चा टिझर थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झाला आहे. भरपूर ऍक्शन सीन व हॉलिवूड पटाच्या तोडीचा ड्रामा यात पाहायला मिळतोय. अभिनेता जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, महेश मांजरेकर, चंकी पांडे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे दक्षिणेतील नामवंत दिग्दर्शक सुजीथ यांनी. या चित्रपटाच्या निर्मितीवर जवळपास ३०० कोटी रुपये खर्च झाल्याचे मानले जात आहे.
