‘वायू’ चक्रीवादळाचा चा धोका टळला पण….
गुजरात: स्कायमेट या खाजगी हवामान वृत्त संस्थेने दिलेल्या पूर्वानुमानानुसार ‘वायू’ चक्रीवादळ आता केवळ गुजरातच्या सौराष्ट्र भागातील किनारी प्रदेशातून मार्गक्रमण करेल. आता ते ओमान च्या दिशेने जात आहे. पण हा धोका जरी टळला असला तरी गुजरात मध्ये अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
आजूनही गुजरात मध्ये रेड अलर्ट जाहीर आहे. चक्रीवादळ ‘वायू’ या वेळी अक्षांश २०.३०° उत्तर आणि रेखांश ६९.५०° पूर्व ला पूर्व-मध्य अरबी समुद्रात घोंगावत आहे. हे वादळ दिव पासून १३० किमी. दक्षिण पश्चिमेला, वेरावल पासून ९० किमी. दक्षिण पश्चिमेला आणि पोरबंदर पासून साधारण १३० किमी दक्षिणेला आहे.
गुजरातच्या अमरेली, गिर, सोमनाथ, दिव, जुनागढ, पोरबंदर, राजकोट, जामनगर आणि द्वारका मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याचा अंदाज स्कायमेट ने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील किनारी भागात पावसाच्या साधारण सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.