Rohit Pawar Twitter PP
घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्याना आपल्या पक्षात विखे, मोहिते कसे चालतात?; रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल
पुणे: मुख्यमंत्री नेहमी आपल्या भाषणात घराणेशाहीवर टीका करतात मग अशावेळी त्यांना सुजय विखे पाटील, रणजित मोहिते पाटील कसे चालतात? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी रोहित यांनी अनेक ठिकाणी बैठका घेतल्या. वाकड येथे नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
रोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. देशात आताची जी स्थिती आहे त्यावरून असे वाटते की, संविधानाने आपल्यला जो मतदानाचा हक्क दिला आहे तोही आपल्याकडून हिसकावून घेतला जाईल, अशी भीती वाटत असल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले.
