Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रॉबर्ट वड्रा यांनी भारताच्या जागी पोस्ट केला चुकून या देशाचा झेंडा; सोशल मीडीयावर उडाला हास्यकल्लोळ

रॉबर्ट वड्रा यांनी भारताच्या जागी पोस्ट केला चुकून या देशाचा झेंडा; सोशल मीडीयावर उडाला हास्यकल्लोळ

नवी दिल्ली: काँग्रेस च्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी रविवारी मतदानानंतर एक ट्विट केलं. या ट्विट मध्ये भारताच्या तिरंग्याच्या जागी चुकून पॅराग्वे या देशाचा झेंडा त्यांनी पोस्ट केला. या नंतर लोकांनी त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वड्रा आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “आमचा अधिकार आमची ताकत आहे! प्रत्येक व्यक्तीला मतदान करायलाच हवं. आम्हाला आपल्या लोकांसाठी उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी अशा लोकांची मदत करायला हवी जे देशाला धर्मनिरपेक्ष व सुरक्षित बनवतील.” या पोस्ट बरोबर हात जोडलेला, भारतीय संसद आणि ‘पॅराग्वे’ च्या झेंड्याचा असे इमोजी वापरले होते.

Robert Vadra Tweet
Robert Vadra Tweet

वड्रा यांची ही पोस्ट चार तासांपेक्षा जास्त काळ त्यांच्या ट्विटर पेज वर उपलब्ध होती आणि तेवढ्या वेळात लोकांची त्या पोस्टची यथेच्छ टिंगल उडवली. या नंतर त्यांनी आपली पोस्ट डिलीट केली व त्यांनंतर आपली चूक मान्य करत नवीन पोस्ट टाकली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *