Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने मिळवले एवढे कोटी रुपये ….

Mumbai Indians IPL 2019 Winner

आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने मिळवले एवढे कोटी रुपये ….

हैदराबाद: आयपीएल २०१९ च्या फायनल मध्ये रोहित शर्माच्या कप्तानीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ज ला हरवत आयपीएल मध्ये इतिहास रचला. मुंबई इंडियन्स ने चौथ्या वेळेला आयपीएल किताब जिंकला आहे. या आधी मुंबईने २०१३, २०१५ व २०१७ साली हा किताब पटकावला होता. या रोमहर्षक विजयानंतर मुंबई इंडियन्स वर करोडो रुपयांच्या इनामांचा पाऊस पडत आहे. आयपीएल आयोजक असलेल्या बीसीसीआय ने विजेत्या संघाला २० कोटी रुपये आणि एक चकाकतं चषक दिलं आहे.

हैदराबाद च्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या या महामुकाबल्यात निर्णय शेवटच्या चेंडूवर झाला आणि इतिहास रचला गेला. जिथे विजेत्या संघाने २० कोटी खिशात टाकले तर उपविजेत्या संघानेही १२.५० कोटी रुपये बक्षीस स्वरूपात मिळवले. त्याचवेळी तिसऱ्या व चौथ्या स्थानी असलेल्या संघालाही अनुक्रमे १०.५० कोटी व ८.५० कोटी रुपये मिळाले. आयपीएल मध्ये सर्वात जास्त धावा बनवणाऱ्या डेव्हिड वॉर्नर ला ऑरेंज कॅप आणि सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या इम्रान ताहीर ला पर्पल कॅप च्या बरोबरीने १०-१० लाख रुपये मिळाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *