रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना आजपासून सुरू
नवी दिल्ली, दि. ०८: रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारने आजपासून सुरू केली. या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आज ही घोषणा केली. गेल्या वर्षभरात देशभरात रस्ते अपघातात १ लाख ८० हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापेैकी ३० हजार जण हेल्मेट न घातल्यानं मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये ६६ टक्के तरुण होते अशी माहिती गडकरी यांनी दिली.
Source – AIR
