Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

समस्त ‘मद्य’प्रेमींनी कृपया इकडे लक्ष द्यावे

भेसळयुक्त मद्यविक्रीस बळी पडू नका ; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आवाहन

मुंबई: नामांकित कंपन्यांचे उच्च प्रतीचे मद्य माफक दरात विक्रीच्या नावाखाली बनावट मद्याच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट मद्यविक्रीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले असून दोषीवर कठोर कारवाई केली आहे. नाताळ व नववर्ष प्रारंभाच्या कालावधीत बऱ्याचदा माफक दरात उच्च प्रतीचे मद्य (स्कॉच) ‘डयुटी फ्री स्कॉच’ च्या  नावाने बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीचे प्रकार झाले आहेत. अशा विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

अशा गुन्ह्यांमध्ये बनावट व भेसळयुक्त मद्यविक्रीतून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होते. त्याचबरोबर अशा मद्यसेवनाने आरोग्यावर देखील विपरित परिणाम होऊ शकतो.

भेसळयुक्त व बनावट मद्य विक्रीची माहिती असल्यास व तक्रार नोंदविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा 18008333333 हा टोल फ्री क्र. आणि 8422001133 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *