Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

टीव-टीव भोवली, अभिनेता फरहान अख्तर विरोधात गुन्हा दाखल

टीव-टीव भोवली, अभिनेता फरहान अख्तर विरोधात गुन्हा दाखल

मुंबई: देशात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन चालू असताना त्यात सलेब्रिटींनीही उडी घेतली असून. या बाबत काही जणांनी आपला रोष ट्विटर च्या माध्यमातून व्यक्त केला आहे. अभिनेता फरहान अख्तर यानेही या संदर्भात एक ट्विट केलं होतं. पण यामुळे तो आता गोत्यात आला आहे. कारण त्याच्यावर काही गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याच्यावर भारतीय दंडविधान कलम १२१ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण किंवा प्रोत्साहित करणं), १२१ अ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट रचणं), १२० ब (गुन्हेगारी कट रचणं) आणि ५०५ (समाजामध्ये तेढ निर्माण करणं) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करत नागरिकत्व कायद्याविरोधात १९ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं आवाहन केलं होत. यावर उलट सुलट प्रतिक्रियाही उमटल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *