आता रेपो दर साडेपाच टक्के
मुंबई, दि. ६: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज व्दैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. एसडीएफ दर सव्वापाच टक्के तर बँक दर पावणे सहा टक्के झाला आहे. आर्थिक वर्ष २०२६ साठी महागाई दर ४ टक्क्यांवरून कमी करुन ३ पूर्णांक ७ दशांश टक्यांवर आणण्यात आला आहे तर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज साडे सहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. पतधोरण समितीची पुढील बैठक ४ ते ६ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहे. ‘आरबीआय’ने व्दैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६६६ अंकांनी वाढून ८२ हजार १०८ अंकांवर व्यवहार करत आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२६ अंकांनी वाढून २४ हजार ९७६ अंकांवर व्यवहार करत आहे.
Source – AIR
