आनंदवार्ता… आज पुनः पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त
मुंबई: आज दि.७ जून रोजी पेट्रोल-डिझेल च्या दरात कपात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दर सतत घसरत असल्यामुळे भारतीयांना थोडा दिलासा मिळत आहे. आज देशात पेट्रोल १२-१४ पैश्यांनी आणि डिझेल ३२-३४ पैश्यांनी स्वस्त झालं आहे.
इंडियन ऑइल च्या वेबसाईट नुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १३ पैश्यांनी घटून ७०.९४ रुपात प्रतिलिटर, तर डिझेल ३२ पैश्यांनी घटून ६४.९० रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे, गुरुवारपेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर इथेही पेट्रोल १३ पैश्यांनी घटून ७६.६३ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ३३ पैश्यांनी घटून ६८.०६ रुपये प्रतिलिटर विकलं जात आहे.
सरकारी पेट्रोलियम कंपन्या लागोपाठ गेले अनेक दिवस पेट्रोल आणि डिझेल च्या दरात कपात करत आहेत. जागतिक बाजारात घटत्या कच्च्या तेलाच्या दरांवर देशात पेट्रोल-डिझेल च्या किमती ठरवल्या जातात.
