नोटा न देण्याबाबत सर्व बँकांना रिझर्व बँकेचे तातडीचे आदेश
मुंबई, दि. १९: भारतीय रिझर्व बँक दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेणार आहे. या नोटा जारी करु नये असे तातडीचे आदेश रिझर्व बँकेने सर्व बँकांना आज दिले. २०१६ मधे चलनाची निकड भागवण्यासाठी दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. आता चलनाच्या गरजेनुसार इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने दोन हजाराच्या नोटा काढून घेण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. सध्या चलनात असलेल्या दोन हजाराच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करुन बदलून घेता येतील. दोन हजारच्या नोटांची चलनी वैधता कायम राहील असं रिझर्व बँकेने स्पष्ट केलं आहे.
Source – AIR