उद्योग विश्वासह सामाजिक क्षेत्रात पसरली शोककळा
मुंबई, दि. १०: भारतीय उद्योग विश्वाचे अर्ध्वयू टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती रतन टाटा यांचे अल्पशा आजाराने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आहे. मृत्यू समयी ते ८६ वर्षांचे होते. मागील अनके दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर उद्योग, सामाजिक, कला तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असून सरकारतर्फे एक दिवसाचा दुखवटा हि पळाला जाणार आहे. एका बाजूला उद्योग विश्वात नवनवे उद्योग काबीज करतानाच रतन टाटा यांनी सामाजिक क्षेत्रात ही मोलाचं योगदान दिलं. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल चं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं शिवाय येथील कर्मचारीही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर दोन आठवड्यात ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली व मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ३६ लाख सहाय्यता निधी देण्यात आला. शिवाय दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांच्यातर्फे करण्यात आली.
