रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी आज सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
आमदारकी-खासदारकीसाठी नाही तर माझ्या मातीची तहान भागविण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आता माढा तर शंभर टक्के जिंकणारच, माढासोबत सोलापूर, साताराही आम्हीच जिकणार आता यात काही वादच राहिला नाही.
रणजितसिंह नाईक निबांळकर यांना भाजपतर्फे माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
