Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्वबळावर लोकसभेच्या 9 जागा लढवणार : खासदार राजू शेट्टी

Raju Shetty Swabhimani Twitter pp

स्वबळावर लोकसभेच्या 9 जागा लढवणार : खासदार राजू शेट्टी

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीत जाणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूकीमध्ये 9 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.
राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी तर बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी मागितली होती. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न आल्याने शेवटी नाराज होऊन खासदार राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढायचे ठरवले आहे.
लोकसभेसाठी धुळे, शिर्डी, सांगली, माढा, हातकणंगले, लातूर, बुलढाणा, वर्धा, कोल्हापूर या नऊ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *