Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र वार्ता च्या पाठपुराव्याला यश; आमदार राजन साळवी यांच्या मध्यस्थीने राजापूर येथील रूग्णवाहिका चालकांचे प्रश्न मार्गी

“प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करणार” – आरोग्य मंत्री राजेश टोपे

रत्नागिरी/मुंबई, दि.१६: राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेले सफाई कर्मचारी, रूग्णवाहिकेचे वाहनचालक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात येणार आहे. भविष्यात वेतन थकणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार असून कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्र वार्ता ने ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकांच्या व सोबतीलाच राज्यातील इतर आरोग्य कर्मचार्‍यांच्या समस्या आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

विधानसभेत सदस्य राजन साळवी यांनी रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिका चालकांच्या मानधनासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हरिभाऊ बागडे, बाळासाहेब देशमुख, प्रकाश आबिटकर, कैलास पाटील, महेश लांडगे यांनी यावेळी उपप्रश्न विचारले. राज्यात दोन सुपर स्पेशालिटी रुग्णालय असून, त्या अनुषंगाने कोकणातही सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात येणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार ३६ कोटीचे वितरण तत्काळ करण्यात येणार आहे. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेवरील कंत्राटी वाहनचालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात येणार आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन नियमानुसार वेतन दिले जात नसेल, तर संबंधित कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

या समस्येबाबत महाराष्ट्र वार्ता ने केलेली बातमी वाचा 

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

शववाहिका आणि रूग्णवाहिकेच्या डिझेलचा खर्चही शासन देणार असून जननी शिशुंसाठी असलेली १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका सर्व ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात येणार आहे. अपघातासाठी १०८ क्रमांकाच्या जुन्या एक हजार रूग्णवाहिका बदलण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *