राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर, घेतली सतेज पाटलांची भेट
मनसे प्रमुख राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी सर्वप्रथम कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत मनसेचे स्थानिक पदाधिकारी हजार होते. त्यानंतर ते सतेज पाटलांच्या घरी भेटीसाठी निघाले. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भेटीनंतर सतेज पाटलांनी हि भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले.