आता १२० ऐवजी ६० दिवसाआधी आरक्षण करता येणार
मुंबई/नवी दिल्ली, दि. १८: रेल्वे आरक्षणाची १२० दिवसांची मर्यादा आता ६० दिवस होणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी ६० दिवस आधी तिकिट आरक्षित करता येईल. येत्या १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे बोर्डाने कळवलं आहे. सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांना या निर्णयाचा काहीही फटका बसणार नाही. पण नव्याने आरक्षण करणाऱ्यांना १ नोव्हेंबरपासून केवळ ६० दिवस पर्यंतचीच तिकिट आरक्षित करता येतील. परदेशी प्रवाशांसाठी ही मर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
Source – AIR
