रायगड जिल्ह्यात अलिबागनजिक रेवदंडा इथल्या आगरकोट किल्ल्यातील तोफ चोरीला
रेवदंडा: रायगड जिल्ह्यात अलिबागनजिक रेवदंडा इथल्या आगरकोट किल्ल्यातील तोफ चोरीला गेली आहे. किल्ल्यातील सिध्देश्वटर मंदिराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या.पर्यटकांसाठी या ऐतिहासिक वस्तूं विशेष आकर्षण होत्या.
मात्र त्यातील एक तोफ चोरीस गेल्याचे स्थानिकांच्या ३० तारखेला लक्षात आले.. ही गोष्ट स्थानिकांनी पोलिसांना कळविली आहे. आगरकोट किल्ल्यात एकूण ४९ तोफा आहेत.या तोफांचे संरक्षण व्हावे आणि या ऐतिहासिक वस्तूंचे चोरट्यांपासून जतन व्हावे अशी मागणी आता इतिहास प्रेमी करू लागले आहेत.
(सौजन्य – AIR)