राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर
राज्य मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार दि. १ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले.
डॉ.शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृषाली यादव सारंग यांना, सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार पुणे इथले महाराष्ट्र टाईम्सचे सचिन वाघमारे यांना, रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कल्याणकर यांना, अनिल कोकीळ सामाजिक पत्रकारिता पुरस्कार साम टिव्हीचे मंगेश चिवटे यांना, तर औरंगाबाद टाईम्सचे संपादक शोएब खुसरो यांना मिर्झा अहेमद अली बेग चुखताई ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
नांदेड इथं येत्या पाच जानेवारीला दर्पण दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
(सौजन्य – AIR)