महत्त्वाच्या धार्मिक आणि पवित्र स्मृतिस्थळांचं दर्शन घेत राहुल शेवाळेंचा अर्ज दाखल
मुंबई: शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल शेवाळे यांनी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेत, त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला वंदन केले. त्यानंतर माहिम दर्गा इथे जाऊन चादर चढवत, राहुल शेवाळे
यांनी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या पाच वर्षात आपण आपल्या मतदारसंघात केलेलं काम हे आपल्याच विजय मिळवून देण्यासाठी पुरेसं असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
