विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. पुत्र सुजय यांनी भाजपात वाजतगाजत प्रवेश केल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.
अहमदनगरची जागा न मिळाल्याने नाराज असलेले सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्वत:चाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने, विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, या भावनेतून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.
