पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपाऱ्यात प्रवाशांचा रेल रोको
पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून या रेलरोकोला सुरुवात करण्यात आली. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज सकाळपासूनच रेल रोको केला. नागरिकांनी या रेलरोकोला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. नालासोपारा परिसरातील दुकाने, रिक्षा, वसई विरार पालिकेची बस सेवा, एसटी सेवाही बंद आहे.
नागरिकांच्या या आंदोलनामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे वाहतूक सेवा बंद पडली आहे.