Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दीड महिन्यासाठी रद्द

पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस दीड महिन्यासाठी रद्द

पुणे : सोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या ‘ब्लॉक’ मुळे दौंड आणि कुर्डुवाडी दरम्यान पुणे – सोलापूर -पुणे इंटरसिटी एक्सप्रेस १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे.

सोलापूर विभागात घेण्यात येणाऱ्या मोठ्या ब्लॉकमुळे पुणे – सोलापूर – पुणे इंटरसिटी सोबत हैदराबाद – पुणे आणि पुणे – हैदराबाद या एक्सप्रेसच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

हैद्राबाद – पुणे एक्सप्रेस ३१ मार्चपर्यंत हैद्राबाद ते कुर्डुवाडी तर पुणे – हैद्राबाद एक्सप्रेस १ एप्रिलपर्यंत कुर्डुवाडी ते हैदराबाद अशी धावणार आहे. या दोन्ही एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. इंटरसिटी एक्सप्रेस तबब्ल दीड महिनासाठी रद्द करण्यात आल्याने पुणे व सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे या काळात फार हाल होणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *