‘पीएमसी’ बँक घोटाळ्यात मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं ३२ हजार पानी आरोपपत्र केलं दाखल
पंजाब-महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक घोटाळ्यात मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागानं 32 हजार पानी आरोपपत्र दाखल केलं. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल झालेल्या या आरोपपत्रात 5 जणांवर आरोप ठेवण्यात आले असून त्यात बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वर्यम सिंग, माजी संचालक सुरजित सिंग अरोडा, तसंच HDIL कंपनीच्या 2 प्रवर्तकांचा समावेश आहे.
फसवणूक, पुरावे नष्ट करणे, बनावट दस्तऐवज बनवणे असे विविध आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. त्याच्याखरीज आणखी 7 जणांना अटक झाली असून त्यांच्या विरुद्ध नंतर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
