“बँकेच्या खातेधारकांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल” मुख्यमंत्र्यांचे पीएमसी बँक खातेधारकांना आश्वासन
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज पीएमसी बँक खातेधारकांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएमसी बँक खातेधारकांना धीर देऊन बँकेच्या खातेधारकांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी ‘पीएमसी’ बँक खातेधारकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मुंबईतील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी “आरबीआय चोर है” अशा घोषणा खातेधारकांनी दिल्या.