पनवेल महापालिका हद्दीत ४ फळ विक्रेते निघाले कोरोना पॉसिटीव्ह; यांच्याकडून फळं खरेदी केलेल्यांमध्ये चिंतेचे वातावरण
पनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोनाबधितांच्या संख्येत १३ ने वाढ झाली आहे. यातील ४ रुग्ण हे खारघर विभागात राहणारे असून त्यांचे निकटवर्तीय जे अत्यावश्यक सेवेत आहेत ते यापूर्वी पॉसिटीव्ह आले आहेत. नवीन पनवेल ‘A’ टाईप हा विभाग कोरोनाचा हॉट स्पॉट ठरू पाहतो आहे. येथे एकूण ६ रुग्णांची नोंद झाली असून यातील ४ रुग्ण हे फळ विक्रेते आहेत तर २ रुग्ण हे किराणा दुकान चालवतात.
नवीन पनवेल येथे फळ विक्रेत्यांना कोरोनाचा बाधा झाल्यामुळे या साऱ्यांकडून गेल्या काही दिवसात ज्यांनी ज्यांनी फळं विकत घेतली ते सर्व आता चिंतेत आहेत. या चार फळ विक्रेत्यांना वाशी येथील APMC मार्केट मध्ये संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या व्यतिरिक्त कामोठे आणि कळंबोली विभागात अनुक्रमे २ व १ कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. खारघर येथील ३२ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा काल रात्री मृत्यू झाला असून मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे. याचसोबत आज एकूण ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Press Note of Date 17/05/2020 pic.twitter.com/eyxa3HCZVS
— Panvel Municipal Corporation (@PanvelCorp) May 17, 2020
