Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर प्रोफाइल वरून भाजपचा उल्लेख गायब; पक्षांतर जवळपास निश्चित

पंकजा मुंडे यांच्या ट्विटर प्रोफाइल वरून भाजपचा उल्लेख गायब; पक्षांतर जवळपास निश्चित

परळी: भाजपच्या कोर कमिटी सदस्या पंकजा मुंडे यांनी काल एका फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून आगामी काळातील राजकीय भूकंपाची नांदी दिली. पण आज याला आणखी दुजोरा देणारी कृती त्यांनी केल्याचे दिसते आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट च्या प्रोफाईल वरून भाजपचा उल्लेख पूर्णपणे काढून टाकला आहे.

वडील दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये एकाकी पडल्या होत्या. मंत्रीपदी असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता राज्यातील भाजपची सत्ता गेल्यामुळे त्यांनी आपला खदखद प्रकट करायला सुरुवात केली आहे. जर १२ डिसेंबर ला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली तर त्यांच्यासमोर दोन पक्षांचे पर्याय खुले राहतील. एक आहे शिवसेना आणि दुसरा महादेव जानकरांचा “रासप”. यापैकी कोणता पर्याय त्या निवडतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *