पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याच्या मुदतीमध्ये सहा महिन्याची वाढ
नवी दिल्ली: पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पॅन आधरला जोडण्यासाठी न्यायलायने ३१ मार्च २०१९ ही अंतिम तारीख दिली होती. परंतु यासाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे.
पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची ही सहावी वेळ आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी पॅन-आधार लिंक केलेले नाही. त्यांना अजून एक संधी मिळाली आहे.
परंतु, १ एप्रिल पासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार नंबर देणे बंधनकारक असल्याची माहिती सीबीडीटीने दिली आहे.
