Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘83’ चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘दिलीप वेंगसरकरां’ची भूमिका

‘83’ चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार ‘दिलीप वेंगसरकरां’ची भूमिका

भारतीय संघाने २५ जून १९८३ या दिवशी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे ही दिनांक प्रत्येक भारतीयाच्या मनात सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहे. याच क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

’83’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये आता आणखी एक मराठमोळा चेहरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चिराग पाटील सोबत आता या चित्रपटात आदिनाथ कोठारेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आदिनाथने आतापर्यंत अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मराठी चित्रपटसुष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख आहे. त्यातच आता आदिनाथ लवकरच ‘83’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

‘83’ या चित्रपटाचे दिग्दर्शिक कबीर खान आहेत. या चित्रपटात आदिनाथ भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून या चित्रपटात काम करण्यासाठी तो खूपच उत्सुक आहे अशी माहिती त्याने आपल्या चाहत्यांना दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *