Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इस्रोची आणखी एक गगनभरारी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोची आणखी एक गगनभरारी, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आज, (१ एप्रिल) अवकाशात आणखी एक मोठी झेप घेतली. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून २८ देशांच्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. आज सकाळी ९ वाजून २७ मिनिटांपासून हे उपग्रह अवकाशात झेपावले. EMISAT या उपग्रहासोबतच काही परदेशी उपग्रहांचेसुद्धा प्रक्षेपण करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत या उपग्रहांचे प्रक्षेपण झाले. यासाठी इस्रोने पहिल्यांदाच सामान्य नागरिकांना आमंत्रित केले होते. यासाठी इस्रोने खास गॅलरी तयार केली होती. त्यात ५ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था होती. तसेच मोठ्या स्क्रीनवर उपग्रहाची माहिती आणि प्रक्षेपण दाखविले.

भारताने काही दिवसापूर्वीच अंतराळातील उपग्रह पाडणारी मिशन शक्ती मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पीएसएलव्ही मालिकेतील हे ४७ वं मिशन ठरणार आहे. एमिसॅट अंतराळात ७४९ किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित केलं जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित २८ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी ५०४ किलोमीटर अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. हे पूर्ण मिशन तीन तास चालणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *