Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पालघरमध्ये राजेंद्र गावित शिवसेनेतुन लोकसभा निवडणूक लढवणार

पालघरमध्ये राजेंद्र गावित शिवसेनेतुन लोकसभा निवडणूक लढवणार

मुंबई: पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राजेंद्र गावित हे आता शिवसेनेच्या तिकिटावरून यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. राजेंद्र गावित यांच्या सोबत मातोश्रीवर श्रीनिवास वनगा देखील उपस्थितीत होते.

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मी स्वत: घेतला आहे, असे श्रीनिवास वनगा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्यानंतर शिवसेनेने पालघर लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

श्रीनिवास वनगा यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना दिले. श्रीनिवासला दिलेला शब्द आजही कायम आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

पालघरमध्ये चांगलं काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी यावेळी दिली. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मला समान आहेत असंही गावित यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *