Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ अभिनेत्रीने केला भाजप प्रवेश

‘या’ अभिनेत्रीने केला भाजप प्रवेश

नवी दिल्ली: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री व समाजवादी पार्टीच्या माजी खासदार जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अमर सिंह आणि आजम खान यांच्याशी मतभेद झाल्यानंतर जयाप्रदा यांनी २०१४ मध्ये आरएलडीमध्ये प्रवेश केला. आरएलडीच्या माध्यमातून त्यांनी बिजनौरमधून निवडणूकही लढवली होती.भाजपकडून जयाप्रदा यांना रामपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखं खंबीर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची देशाला गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असं जयाप्रदा यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *