Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाकिस्तानच्या लोकांच्या छातीतही हृदय असतं, ते खूप प्रेमळ असतात : ड्रामा क्वीन राखी सावंत

पाकिस्तानच्या लोकांच्या छातीतही हृदय असतं, ते खूप प्रेमळ असतात : ड्रामा क्वीन राखी सावंत

सतत काहीना काही कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ने आज पुन्हा एकदा हलकल्लोळ उडवून दिला आहे. त्यांचं झालं असं की राखी ‘धारा ३७०’ नावाच्या चित्रपटात काम करत आहे. यात ती एका पाकिस्तानी मुलीची भूमिका वठवत आहे. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिने पाकिस्तानी झेंड्यासोबत काढलेले आपले फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत. आणि खाली कॅप्शन दिले आहे की, “मी माझ्या देशावर प्रेम करते, पण ‘धारा ३७०’ चित्रपटात माझी ही भूमिका आहे”

https://www.instagram.com/p/BxMf7c2FKRY/?utm_source=ig_share_sheet&igshid=ant3rv8jjblz

या फोटोवरून जेव्हा तिच्यावर टीका केली जाऊ लागली त्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी लगेच तिने एक व्हिडिओही शेअर केला. यात ती म्हणतेयकी, “मला या चित्रपटात एक पाकिस्तानी मुलगी म्हणून दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या लोकांच्या छातीतही हृदय असतं. ते खूप प्रेमळ असतात. सगळे वाईट नसतात. काही लोकं जिहादच्या नावाखाली स्वतःच्याच देशाच्या, धर्माच्या विरुद्ध असतात. मी पाकिस्तानच्या लोकांचा मान राखते…”

https://www.instagram.com/p/BxNWmIOlpY6/?utm_source=ig_share_sheet&igshid=17bn0uorqrrw7

राखीच्या या फोटोवर जवळपास २५०० पेक्षा जास्त लोकांनी कंमेंट केली. त्यात तिला अपेक्षेप्रमाणे शिव्यांची लाखोलीच वाहण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *