Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘सलमान’ विना लग्नाचं सरोगसी द्वारे पिता होण्याबाबत विचार करत आहे

‘सलमान’ विना लग्नाचं सरोगसी द्वारे पिता होण्याबाबत विचार करत आहे

जर तुम्ही सलमान खान चे हार्डकोर फॅन आहात तर तुमच्या डोक्यात एक प्रश्न सतत फिरत असेल, की सलमान खान लग्न कधी करणार? पण या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत कोणालाही मिळालेलं नाही. पण आता सलमानच्या फॅन्स साठी एक खुशखबर आहे. सलमान लग्न कधी करणार या बद्दल तर सांगता येणार नाही पण तो ‘बाबा’ होण्याच्या बाबत जरूर विचार करत आहे.

हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. सलमान पिता होण्याबाबत विचार करत आहे पण लग्न न करता. एका इंग्रजी वेबसाईट मध्ये छापलेल्या बातमी नुसार तो पिता होण्याबाबत विचार करत आहे. तशी ही गोष्ट लपून राहिलेली नाही की सलमान ला मुलांची खूप आवड आहे. मुलांप्रति त्याचे प्रेम बऱ्याच प्रसंगी पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत सलमानचा लग्नाबाबत कसलाच विचार नाहीये, यामुळेच तो ‘सरोगसी’ द्वारे बाबा बनण्याबाबत विचार करत आहे.

जर सलमान सरोगसी च्या माध्यमातून पिता झाला तर असं करणारा तो काही पहिला ऍक्टर-ऍक्टरेस नसेल. या आधी शाहरुख खान, करण जोहर, एकता कपूर, सनी लिओनी हेही सरोगसी द्वारे पालक झालेले आहेत. तुमच्यासाठी म्हणून सांगते की सलमानचे वय ५३ वर्ष आहे. आणि तरीही हो परफेक्ट बॅचलर आहे.

– स्वानंदी पाटील (मनोरंजन)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *