Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेसने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली: पंतप्रधान नरेंद्र मोदी

NAMO TWEET

काँग्रेसने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्‍ल्‍यावर प्रश्‍नचिन्ह उपस्‍थित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सॅम पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले की, ‘सर्वात विश्वासू सल्लागार आणि काँग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सुरक्षा दलांचा अपमान करत काँग्रेसच्या वतीने पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे’.

काँग्रेसच्या घराणेशाहीच्या निष्ठावंत दलालांनी जे देशाला आधीपासून माहिती आहे की, काँग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचं नव्हतं हे त्‍यांनी पुन्हा सांगितलं आहे. हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल

१३० कोटी भारतीय जनता कधीच हे विसरणारही नाही आणि काँग्रेस माफही करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधानांनी पित्रोदा यांच्यावर टीका केली. भारतीय नागरिकांचा आमच्या लष्करावर पूर्ण विश्वास असल्याचेही पंतप्रधान ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

भारतीय हवाई दलाने ३०० लोकांना मारले असेल तर ठीक आहे, असे म्हणत मात्र, याचे पुरावे दिले जातील का?, असा सवाल पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात किती दहशतवाद्यांना मारले आणि त्याने काय परिणाम झाला हे जाणून घेण्याचा भारतीय नागरिकांना हक्क नक्कीच आहे, असेही पित्रोदा म्हणाले. यावर पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *