“काय पोरकट मुख्यमंत्री आहे”; निलेश राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
मुंबई: ट्विटर वर नित्य ऍक्टिव्ह असणारे माजी खासदार निलेश राणे यांनी पुनः एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. यावेळी विषय आहे केंद्राकडून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महसूल माफीबाबतचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे दोन वर्षांच्या महसूल माफीची मागणी केली होती त्यामुळे शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होतील असं त्यांचं मत आहे.
वाचा यावर नेमकं काय म्हणाले निलेश राणे
काय पोरकट मुख्यमंत्री आहे. प्रत्येक राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेग वेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचे असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय?? https://t.co/VtKpyScUTL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 2, 2019
