‘राष्ट्रीय तपास संस्थे’कडून उत्तरेतील राज्यात विविध ६ ठिकाणी छापेमारी
जबलपुर, दि. २७: राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए ने देशातील विविध सहा ठिकाणी छापे टाकले असून यामध्ये मध्यप्रदेशातील जबलपूर इथल्या एका वकिलाच्या कायाॆलयाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि भोपाळच्या एनआयएच्या चमुने जबलपूर च्या बाडी ओमटी भागात छापे टाकले. या छापेमारीत दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईबाबत सध्या स्थानिक पोलिस किंवा एनआयएकडून कोणतंही निवेदन आलेलं नाही. NIA ने नुकतीच राज्यव्यापी कारवाई करताना खांडवा, बरवानी, सिवनी आणि भिंड इथं छापे टाकून संशयास्पद कारवायांमध्ये गुंतलेल्या काही लोकांना पकडलं होतं. आज टाकलेला छापाही त्याच तपासाशी संबंधित आहे.
Source – AIR