NCP Png File
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, हे आहेत उमेदवार
काल गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीने बारा उमेदवारांची घोषणा केली होती. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादीने पाच उमेदवार जाहीर केले आहेत. नुकतचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे यांना शिरुरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. अमोल कोल्हे आधी शिवसेनेमध्ये होते. राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र समीर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
नाशिकच्या दींडोरीमधून धनराज महाले बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
दुसरी यादी –
पार्थ पवार – मावळ
अमोल कोल्हे – शिरूर
समीर भुजबळ – नाशिक
धनराज महाले – दिंंडोरी
बजरंग सोनवणे – बीड
