Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पीअर-टू-पीअर कर्ज देण्याबाबत बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांना(NBFC) ‘आरबीआय’कडून सतर्कतेचा ईशारा

पीअर-टू-पीअर कर्ज देण्याबाबत बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांना(NBFC) ‘आरबीआय’कडून सतर्कतेचा ईशारा

मुंबई, दि. १०: भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांनी बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांना पीअर-टू-पीअर कर्ज देण्याबाबत सावध केलं आहे. या कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत नसलेल्या काही व्यवसाय पद्धती स्वीकारल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या सहाव्या परिषदेत बोलत होते.

कर्जदारांना कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत अंतर्भूत असलेल्या जोखमींबद्दल सतर्क न करता, या वित्त कंपन्या पीअर-टू-पीअर कर्ज देताना विविध माध्यमांद्वारे जोखीम कमी करत असल्याचं दिसून आलं आहे, असं ते म्हणाले. उच्च किंवा खात्रीशीर परताव्याचं आश्वासन देणं, व्यवहारांची रचना करणं, कधीही निधी परत मागण्याची सुविधा प्रदान करणं, या आणि अन्य काही मार्गांचा यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांकडून परवाना अटी आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं कुठल्याही स्वरूपाचं उल्लंघन स्वीकारार्ह नसल्याचं ते म्हणाले.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *