Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर; मालमत्ता करमाफी प्रस्ताव सर्वानुमते मंजूर

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर; मालमत्ता करमाफी प्रस्ताव सर्वानुमते मंजूर

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंत असलेल्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफी आणि ५०१ ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के सवलत देण्याचा अशासकीय प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मुंबई महानगरपालिकेचा मालमत्ता करमाफी चा ठराव मंजूर केला. हा ठराव मंजूर केल्यानंतर ते म्हणाले की आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिकांनी जर असा ठराव मंजूर केला तर शासन त्याचे स्वागतच करेल. त्यानंतर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी याप्रश्नी पुढाकार घेत सदर प्रस्ताव मंजूर करण्याबाबत पक्षाच्या नगरसेवकांना सूचना दिल्या. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ३ लाख ४१ हजार मालमत्ताधारकांना पैकी १ लाख ८४ हजार मालमत्ताधारकांना या कर्जमाफीचा लाभ होऊ शकतो. आता राज्य शासन सदर प्रस्तावाबाबत कोणती भूमिका घेते याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *