Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा उद्या नाशिकमध्ये

युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा उद्या नाशिकमध्ये

नाशिक: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी १७ मार्च रोजी नाशिकमध्ये शिवसेना-भाजपा युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा होणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता नाशिक येथील चोपडा लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील युतीचे लोकप्रतिनिधी – पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

युतीच्या संयुक्त मेळावा पूर्वतयारीसाठी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात युतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार अनिल कदम, आमदार राहुल आहेर, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना – भाजप पक्षांचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *