पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अयोध्येतल्या राम मंदिराला घेऊन गंभीर नाहीत : कपिल सिब्बल
नवी दिल्ली: सत्ताधारी भाजप व काँग्रेस यांच्यातला रणसंग्राम-वाकयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज काँग्रेस चे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी एक नवीन तोफ डागली आहे. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष अयोध्येतल्या राम मंदिराला घेऊन गंभीर नाहीत, परंतु लोकांच्या भावनांचा वापर करून त्याचा उपयोग निवडणुकीच्या दरम्यान केला जात आहे.
सुन्नी वक्फ बोर्डच्या खटल्यात विशेष वकील म्हणून काम पाहिलेले सिब्बल म्हणाले की, “ते या विषयात रस घेत नाही आहेत. ते पुन्हा लोकांना मूर्ख बनवत आहेत. ही एक वेगळीच नौटंकी आहे. ते लोकांच्या भावनांचे शोषण करत आहेत. ते पुढे म्हणाले की मोदींसाठी हा विषय जास्त महत्वाचा नाही, नाहीतर त्यांनी आधीच हा विषय उचलला असता. मोदी राम मंदिर या विषयाला घेऊन गंभीर नाहीत. जर त्यांना या विषयाला घेऊन चिंता होती तर त्यांनी २०१४,१५,१६ किंवा १७ मध्ये हा मुद्दा का नाही उचलून धरला?
मुळात राम मंदिर हा समस्त हिंदुत्ववाद्यांचा जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय. त्यामुळे नेमकं कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप च्या मर्मावरच बोट ठेवलं आहे. याचे प्रत्युत्तर ते आता कशा प्रकारे देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
